दिलीपकुमारची लोकप्रियता हा एक सच्चा सांस्कृतिक प्रवाह होता आणि या पुस्तकातून मी त्याचे मूळ शोधायचा प्रयत्न केला आहे!
नेहरू युगातील भारतीय चित्रपट हा या पुस्तकाचा विषय आहे. या युगात दिलीपकुमार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्याने आमचे जीवन भारून टाकले होते. त्याच्या भूमिकांमधून रेखाटले जाणारे आदर्श आमच्या मनात खोलवर रुजत होते. हे पुस्तक त्या भूमिका आणि आमच्या जीवनावर त्यांचा कसा प्रभाव पडला, याविषयी आहे. हे दिलीपकुमारचे चरित्र नाही. आपल्याला जर गॉसिप आणि कुचाळक्यांमध्ये रस असला, तर ते दुसरीकडे शोधा.......